वेढलेल्या विचारांनी वेढलेले मन सारे.
वेढलेल्या ब्रम्हांडात या वेढलेले सूर्य तारे.
सुखासाठी घेतलेले दु: खा भोवती वेढे सारे.
वेढ्यात मश्गुल जाहले सुख दु:खाचे हे पसारे.
मोकळा हा श्वास घ्यावा, थंड वारा उरी भरावा.
भरलेल्या या उरावर दु:खाचा हरएक वार घ्यावा.
वेढ्यात मुग्ध होण्यापलीकडेहि जीवनाचा अर्थ आहे.
वेढ्यात राहून कंठ्लेले आयुष्याच हे व्यर्थ आहे.
वाट कुणाची पाहू नको आता, तू तुझा समर्थ आहे.
इतरांना सुख वाटणे, हाच जीवनाचा अर्थ आहे.
No comments:
Post a Comment