Friday, July 1, 2011

नाचले आज थेंब दारि....


लपलेला पाऊस...


Tuesday, May 24, 2011

असचं.....

थेंब थेंब पावसाचा वेड लावूनी जातो.
थेंबाथेंबात आनंद जणू भरुनी वाहतो.

थेंब पावसाचा घ्यावा अलगद ओठावरी
जणू सागराच्या लाटा आदळती काठावरी.
   -   कवी शैलेश

Thursday, April 28, 2011

शीर्षक- वाट


वाट चालली मी न चाललो, मी तर वाटेवरती उभा
क्षितिज मनाचे ओलांडून साद घालितो आज नभा.

वाटेवरती कुणी भेटले,सगे सोयरे सारे भासले.
साथ सोडुनी कधीच ते गेले ,रडलो मी अन सारे हासले.

एकट्याच त्या वाटेवरती,एकटाच मी कसा राहिलो.
वळण असे हे कधी घेतले,वाटेशी मी बोलू लागलो.

गुपित हे मज उमजले,वाट जरी ही एकटी आहे
समांतर या वाटेला,अजुन कुणाच्या वाटा आहे.

प्रत्येकाची वाट निराळी,वाटे आपली वाट ही खडतर.
डोकवुनी कधी पहावे,दरिच्याही कुणाच्या वाटा आहे.
                                             - शैलेश 
रमेश कळमकर

Friday, April 15, 2011

कट कट....

पुरे ती कट कट वट वट सारी
रोजची  झंजट रोजच मारी

पुरे तो कायम वेळेचा फास
त्यात गुदमरलाय मोकळा श्वास

पुरे तो बटनांचा टप टप खेळ
झोपायची आता झालिये वेळ
                                  - शैलेश रमेश कळमकर

Thursday, February 10, 2011

शिर्षक कविता

प्राजक्त या फुलाने धुंद सुगंध ल्याला
मन बावरे म्हणुनी बेहोष करुनी गेला.

प्राजक्त या फुलाचे सौंदर्य खुललेले.
नयन प्याला करुनी साठवून घेतलेले.

प्राजक्त या फुलाचा सुगंध पसरलेला.
शोधात सुगंधाच्या मी अजून हरवलेला....
                                                     - शैलेश रमेश कळमकर 

just ....



कधी फुलाच्या शोधात नकळत मी फुलावे
कधी नसणाऱ्या झोपळ्यावर अलगद मी झुलावे

मधमाशी बनुन फुलाशी हितगुज मी करावे.
फुलतील मकरंद हळूच मी चाखावे

फुलाच्या पाकळीला नाजुक मी स्पर्शावे
नाजुकश्या स्पर्शाने फुल शिरशिरावे

फुलाच्या सानिध्यात असेच मी जगावे
जगताना एक दिवस फुलाबरोबर कोमजावे
                         - शैलेश रमेश कळमकर 

Wednesday, February 9, 2011

on Marathi

कोण म्हणतो तुकवीन मान मराठीची
अमृतालाहि नाही हरली हि पैंज मराठीची 


बंधूभावाचे आलिंगन हि रीत मराठीची
आलिंगनातही खोड मोडते हि जात मराठीची 

                          - शैलेश रमेश कळमकर

TI geli tevha :) a different approach


कशाला व्हावी हि जीवाची धगधग!
चालून गेली जशी ती शेजारून लगबग!

कशाला पाहावे मी तरी हसून
जरी पहिले तिने हळूच लाजून

मनात तिच्या जसे नव्हतेच काही
मीही कधी तिला बोललोच नाही

बोलायचे होते ते मनातच राहून गेले.
आशेचे फुल निर्माल्य म्हणून वाहून गेले
                      - 
शैलेश रमेश कळमकर

one on LOVE - poem

डोळ्यात मी पाहता जीव कासवीस झाला.
डोळ्यातून प्राण माझा हृदयात घसरला.

हृदयात येउनी तरी तो कुठे सुखावला.
तुझ्या नजरेचा तीर वार करुनी गेला.

घायाळ हा प्राण आता कुठे मी न्यावा.
आता याला आसरा हृदयात तूच द्यावा.
-कवी शैलेश

One more wish please -poem

कोण कोणासाठी जगतो यात काय गूढ आहे
स्वर्थासवे या आज उपकार मूढ आहे .

का बैसुनी करिसी वैताग या मनाचा .
कोणासाठी तरी रच विचार आज सुखाचा .

नाही दिसणार तुला किनार या इच्छांची
या भाबड्या इच्छांचा तागा अनंत आहे
                     - 
शैलेश रमेश कळमकर

One of my earliest Poem

स्वप्नातल्या रंगमहाली एक परी मी पहिली
अश्रु नयनी ल्यालेली ती नाजूक पण हिरमुसली

स्वप्नांच्या या मोहक देशी दु:ख कसे दाटले
वाटले मज हर्ष सारा सुख येथेच नांदले

जवळी कसे जावे मी अन काय कसे हे पुसावे
रडावे मी तीच्या सम कि, हसण्याला सांगावे

जणू वीणेची तंग तार अवखळपणे छेडली
त्याच स्वरात रंगुनी ती पुढे बोलली

स्वप्नांची हि दुनिया सुखी कशी रे वाटली
वास्तवाच्या सुख थेंबाला स्वप्न कुंभे आटली .

घेउनी आस वास्तवाची सुख स्वप्ने तू पहिली
वास्तवाची वाट सोडूनी स्वप्नेच तू निरखली

रडणे हे आज माझे नसे रे मजसाठी .
एक इशारा दिला मी हा समज रे तुजसाठी .

अशीच पहिली स्वप्ने जर तू मला रड्लेलीच पाहशील .
वास्तवात भान सोडूनी स्वप्नात रमत जर राहशील

नको घाबरू कशी होतील स्वप्ने सारी आठवून
हो तयार वास्तवात धैर्य मनात साठवून

कोण होती हि परी मला काही सुचेना
उपदेश तिचा कानातुनी कधीच जाइना

पूर्तता मी म्हणुनी ती गुप्त क्षणात जाहली .
परत तिला मी हसताना वास्तवातच पहिली .

- कवी शैलेश

Charoli

हसण्यावीन अश्रूंचा अर्थ व्यर्थ आहे
दु:खासह सुखाचा अधिकार सार्थ आहे .

हस आज सुखाने , हसण्यात सर्व आहे .
रडण्यात नाश होई ,प्रयत्नात राम आहे
-कवी शैलेश

My Poem

रोज रोज परवड मला सुखाची वाटते .
क्षणभर सुखपायी दु:ख डोंगर वाटते .

हसतो आज कान्हा हाल माझे हे पाहून .
नाही सुटणार तू बोले गालात हसून .

घे दु:ख कवटाळून, नको करू आटापिटा .
डोंगर नाही हा तर मार्गीचा फुफाटा .

गाडा सुखाचा पळत नाही फुफाट्याविन .
कर माझी आठवण जाईल रोजचाच शीण
                        - 
शैलेश रमेश कळमकर