वाट चालली मी न चाललो, मी तर वाटेवरती उभा
क्षितिज मनाचे ओलांडून साद घालितो आज नभा.
वाटेवरती कुणी भेटले,सगे सोयरे सारे भासले.
साथ सोडुनी कधीच ते गेले ,रडलो मी अन सारे हासले.
एकट्याच त्या वाटेवरती,एकटाच मी कसा राहिलो.
वळण असे हे कधी घेतले,वाटेशी मी बोलू लागलो.
गुपित हे मज उमजले,वाट जरी ही एकटी आहे
समांतर या वाटेला,अजुन कुणाच्या वाटा आहे.
प्रत्येकाची वाट निराळी,वाटे आपली वाट ही खडतर.
डोकवुनी कधी पहावे,दरिच्याही कुणाच्या वाटा आहे.
- शैलेश रमेश कळमकर